कांदा अनुदान वाढले! शिंदे सरकारचा मोठा निर्णय | कांदा अनुदान 2023

 


kanda-anudan-2023-maharashtra

कांदा अनुदान 2023: नमस्कार शेतकरी, बांधवांनो आताची सर्वात मोठी बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. अनुदान वाढवण्यासंबधी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. या आगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला 300 रुपये अनुदान जाहीर केले होते.

त्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याला अनुदान वाढवून द्या अशी मागणी पुन्हा केली होती, काल शेतकरी शिष्टमंडळ आणि सरकार मध्ये बैठक पार पडली होती, त्यात राज्य सरकार ने शेतकऱ्यांची बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. (कांदा अनुदान 2023)

त्याच बरोबर शेतकऱ्यांना संप मागे घेण्यासाठी सरकार कढून आवाहन पण केले गेल आहे.


बहुतांश मागण्या मान्य झाल्या, तरीपण सरकार जो पर्यंत निर्णयाचा gr काढत नाही तो पर्यंत शेतकरी ठिय्या आंदोलन करणार असे शेतकरी किसान संघटने कडून सांगण्यात आंल आहे.

कांदा अनुदान 2023 माहिती मराठी (कांदा बाजारभाव नवीन अपडेट)

आज विधासभेत कांद्यवरून बरीच चर्चा झाली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह शिंदे सरकार मधील अनेक नेत्यांनी आप आपली बाजू मांडली. {कांदा अनुदान 2023}

सोबतच विरोधी पक्ष नेत्यांची देखील बाजू ऐकून, संपूर्ण विचारांती राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आगोदर दिलेली अनुदान रक्कम प्रती क्विंटल 300 रुपयांमध्ये 50 रुपये अधिक चे वाढवून कांद्याला सरसकट हमीभाव अनुदान रुपये 350 करण्यात आले आहे.

हे पण वाचा: कांदा अनुदान वाढ शासन निर्णय 2023

अशी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे. त्या संबंधीची माहिती, ट्विटर वर शासनाद्वारे सांगण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बोलतांना म्हणाले, कांद्याला ३०० ऐवजी ३५० रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच आंदोलकांच्या बहूतांश मागण्या मान्य आहेत. त्यामुळे गावित यांनी लाँग मार्च थांबवावा.

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तर शेतकरी बांधवांनो ही होती, कांदा अनुदाना संबंधीची महत्वाची अशी अपडेट.


By farm tech 18 

Comments

Popular posts from this blog

Instagram cool bio for instagram